नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा थकबाकीदारांसाठी मोठी दिलासा योजना :-पिंपरी चिंचवड महापालिकेची ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरू, मनपा करावरील बिलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

थकबाकीदारांसाठी मोठी दिलासा योजना :-पिंपरी चिंचवड महापालिकेची ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरू, मनपा करावरील बिलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पिंपरी २७ फेब्रुवारी २०२६ – शहराच्या विकासासाठी मालमत्ताकर हा महत्त्वाचा महसूल स्त्रोत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा नागरिकांच्या  मालमत्ता करातूनच उभ्या राहत आहेत. वेळेत कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना असून, नागरिकांच्या करातूनच शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा व इतर विकासकामे उभी राहत असतात.

आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत सुमारे ७४७  कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच वर्तमानपत्र, सोशल मिडीया व ‍विविध माध्यमातुन मालमत्ता कर भरण्याचे नागरिकांना आवाहन करणेत येत आहे. तसेच, शहरातील एकूण सुमारे २ लाख १२ हजार ४४० थकबाकीदारांनी अद्यापही थकीत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीदारांनी विलंब न करता त्वरित संपूर्ण रकमेचा भरणा करावा असे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत वेळोवेळी केले जाते.

विशेष सवलत :-

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ताकर वसुलीस गती देण्यासाठी व थकीत मालमत्ता कर वसुल होणे करीता दि. ०१ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी तसेच औद्योगिक व मोकळ्या जागा यांची थकबाकी एकरकमी भरल्यास मनपा कर बिलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे.

मालमत्ताकराची थकबाकी प्रलंबित असलेल्या मालमत्ताधारकांसाठी ही मोठी आर्थिक दिलासा देणारी योजना ठरणार आहे. आर्थिक वर्ष २०२५ – २०२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यासच या सवलतीचा लाभ घेता येणार असून,  दि. ०१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत पूर्ण भरणा करणे आवश्यक आहे.

टीप

महापालिकेची ‘अभय योजना’ ही नागरिकांना दिलेला विश्वासाचा शब्द आहे. थकबाकीमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ९० टक्के  मनपा करावरील बिलंब दंडावर सवलत देण्यात येत आहे. शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही मर्यादित कालावधीची संधी साधून ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा  रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

टीप

१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास मनपाकर शास्तावर ९० टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू असून थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहील.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728