नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा समर्थ पोलीसांची कारवाई चोरट्यांकडून ०२ ऑटो रिक्षा व ०१ मोटरसायकल जप्त – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

समर्थ पोलीसांची कारवाई चोरट्यांकडून ०२ ऑटो रिक्षा व ०१ मोटरसायकल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

संपादक पुणे जिल्हा फिरोज शेख

दि :११/१२/२०२४ 

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर – २५६ / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची ऑटो रिक्षा अज्ञात इसमाने चोरी केली म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी घटनास्थळ व आजुबाजुचे परीसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासुन तसेच गुप्त बातमीदाराकडुन प्राप्त माहीतीचे आधारे आरोपी नामे आनंद उर्फ अक्षय प्रल्हाद साळुंखे वय २३ वर्षे, रा. मानकाई नगर, माहेरघर संस्था नजीक, आव्हाळवाडी, पुणे यास शिताफिने ताब्यात घेवुन आरोपीकडे तपास केला असता आरोपीकडुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली रिक्षा तसेच चतुश्रुंगी पोलीस स्टेशन कडील चोरीस गेलेली ०१ रिक्षा व हडपसर पोलीस स्टेशनकडील चोरीस गेलेली ०१ मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडील ०१ गुन्हा, चतुश्रुंगी पोलीस स्टेशन कडील ०१ गुन्हा व हडपसर पोलीस स्टेशनकडील ०१ गुन्हा असे एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि १, पुणे शहर श्री. संदीपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग,पुणे, (अति. कार्यभार फरासखाना विभाग, पुणे शहर) श्री साईनाथ ठोंबरे समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे, सहा. पो. फौजदार संतोष पागार, पोलीस अंमलदार इम्रान शेख, रविंद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे यांनी केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

February 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728