अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत ८ लाख ५७ हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत ८ लाख ५७ हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त*
पुणे, दि. २४ : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ९ ठिकाणी विविध छापे टाकून ८ लाख ५७ हजार ३५५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक करणाऱ्या आस्थापना सील व वाहतूक करणारे एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
गेल्या तीन दिवसात पुणे विभागात ३८ ठिकाणी विविध छापे टाकुन ९ लाख ३२ हजार ३८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ८ आस्थापना सिल करण्यात आल्या असून ९ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे विभागात ३६ आस्थापना सिल करण्यात आल्या असून २४ गुन्हे दाखल केले आहेत.
नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space