अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी महापौर हनुमंतराव भोसले ,यांच्या हस्ते झाले
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दि ०९/१२/२०२४
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सलमानी समाजाची संख्या अधिक मोठ्या प्रमाणात असून त्यांचे प्रश्न सोडवण्या करीता व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अखिल सलमानी समाज विकास संस्था कार्य करत आहे ,अखिल सलमानी समाज विकास संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक,आर्थिक व महिला सक्षमीकरण या सारखे अनेक उपक्रम राबवत असते
दिनांक ०९ डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळी ४ वाजता नेहरूनगर येथे अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी महापौर हनुमंतराव भोसले , तसेच भाजपा सरचिटणीस संजय मंगोडेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या निमित्तानं अखिल सलमानी पतसंस्थेच्या सभासद नोंदणीचा शुरुआत करण्यात आली!
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख नशीम सलमानी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना असे म्हणाले की अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचा विकास त्याच बरोबर आरोग्य ,शिक्षण ,आर्थिक विकास यासाठी काम करणार आहोत आज पिंपरी चिंचवड शहरातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले येथून पुढे पिंपरी चिंचवड शहराचे सर्व कामकाज याच कार्यालयातून होईल सध्या अखिल सलमानी समाज विकास संस्था संपूर्ण महाराष्ट्रात समाजतील आर्थिक दुर्बळ वंचित घटकातील समाजाकरिता तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेला विद्यार्थ्यांसाठी व सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी कार्यरत आहे सलमानी समाजाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले आनंद वाटला आमच्या प्रभागातून त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यांचे कार्य आणि विस्तार वाढत जाओ अशी सदिच्छा माजी महापौर हनुमंतराव भोसले यांनी दिल्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे – अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून उत्तम कार्य घडत आहे आपल्या प्रगतीकरिता टाकलेले पहिलं पाऊल महत्वाचे ठरेल समाजाचा आर्थिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरण हे ध्येय महत्वाचे आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
यावेळी राजन गुंजाळ ,दीपक भंडारी ,संतोष शिंदे ,संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख , कार्याध्यक्ष शेख सिकंदर, शेख जलालुद्दीन , शेख हैदर, शेख इकराम ,शेख रिजवान , सलामु रेहमानी . शेख महमूद , शेख आलम ,शेख समशेर ,शेख कय्यूम , शेख कासिम, शेख हजरत,शेख सलमान,शेख, सुलतान,शेख फारुख,शेख शौकत, शेख सोएब, शेख सलीम,अस्लम उर्फ गुड्डू शेख वकील शेख वाहिद शेख आणि सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले त्या बद्द्ल संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नसीम सलमानी यांनी आभार मानले
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space