भीक मागण्याचा बहाना करुन उघड्या दरवाजावाटे घरात घुसुन सोने व रोख रक्कम चोरी करणा-या आरोपींना चंदननगर पोलीसांनी केली अटक
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दि ८/१०/२०२४ संपादक पुणे जिल्हा : फिरोज शेख
चंदननगर पोलीस स्टेशन गु. रजि.नं.२४६/२०२४, भादवि कलम ३८० प्रमाणे उघड्या दरवाजावाटे घरात घुसुन सोने व रोख रक्कम चोरी झालेबाबत दाखल असलेल्या गुन्हयामधील आरोपींचा व चोरीस गेले मालाचा तपास पथकाचे अधिकारी सपोनि खांडेकर व तपास पथकातील अंमलदार यांचेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत होते. चोरीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे लाल रंगाचे चारचाकी टेम्पो सारख्या गाडीचा व चोरी करणारे महिला व इसम यांची माहिती प्राप्त झाली होती.
सपोनि खांडेकर हे तपास पथकातील अंमलदार यांचेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रालिंग करत होते त्याच दरम्यान पो. हवा नाणेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली की,मागील दोन/तीन महिन्यापुर्वी पैसे व सोने चोरी करणारे फुटेजमधील वर्णना सारखी महिला व इसम हे आळंदी देवाची येथे एका लाल रंगाचे चार चाकी टेम्पो सारख्या गाडीसह उभे आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाकडील अंमलदार व महिला स्टाफ असे बातमीचे ठिकाणी रवाना होवुन त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मिली दिपक पवार, वय २० वर्षे,रा.आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक व एक विधिसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले.त्यांचेकडे असलेल्या महिंद्रा गाडी बाबत विचारपूस करता त्यांनी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पुढील कार्यवाही करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे सोने व पैसे मिळून आल्याने त्यांना सदर सोने व पैशांबाबत विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले कि, सदरचे सोने व पैसे हे आम्ही दि.१८/०८/२०२४ रोजी टिंबर मार्केट,पुणे येथे एका घरातून चोरी केले असलेबाबत सांगितल्याने सदरबाबत खडक पोलीस स्टेशन अभिलेखावर पाहणी केली असता, खडक पो.स्टे पुणे शहर गुन्हा रजि नंबर २७६/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचेकडे चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २४६/२०२४ भा.दं.वि कलम ३८० या गुन्हया बाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मागील ३ महिन्यापुर्वी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ३५,००,०००/- रू किंमतीचे ५२ तोळे वजनाचे वेगवेगळया प्रकारचे सोन्याचे दागिने तसेच २६,६००/रू.रोख रक्कम, व ५,५०,०००/- रू किंमतीची महिंद्रा ईम्पेरिओ कंपनीची लाल रंगाची चारचाकी गाडी असा एकुण ४०,७६,६००/- ( चाळीस लाख, शहात्तर हजार सहाशे) रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space