नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील गावठी हातभट्टीची दारू अवैधरित्या विक्री करून सामान्य नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण करणारा सराईत गुंड  पुणे यास एम. पी.डी.ए कायद्यातंर्गत नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील गावठी हातभट्टीची दारू अवैधरित्या विक्री करून सामान्य नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण करणारा सराईत गुंड  पुणे यास एम. पी.डी.ए कायद्यातंर्गत नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

दिनांक ६/१०/२०२४    पुणे जिल्हा संपादक : फिरोज शेख

पुणे शहरातील वाढत्या अवैध गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विक्रीस आळा बसविण्याकरिता मा. अनितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले होते.

त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे चा गुन्हे अभिलेखावरील अवैधरित्या गावठी हातभटीची दाल विक्री करणारा सराईत व अटट्ल गुन्हेगार नामे- अर्जुन सतपाल कुंभार वय २४ वर्षे, रा. रुम नं. २, पाझर तलावाशेजारी, जांमुळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव बु.।।, पुणे याचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे सन २०२१ पासून, अवैव गावटी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विक्रीचे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. स्थानबदध इसमाचे वाढते गुन्हेगारी कारवाईना आळा घालणे साठी सन २०२२ व २०२४ साली म. प्रो. अॅ. १९४९ चे कलम ९३ प्रमाणे कारवाई करुन देखिल त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक सुधारणा झालेली नव्हती.

नमुद सराईत गुंड व स्थानबध्द इसम नामे अर्जुन सतपाल कुंभार वय २४ वर्षे, रा. रुम नं. २, पाझर तलावाशेजारी, जांभुळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव बु.।।, पुणे याचेविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो औवधरित्या गावठी हातभट्टीची दारु विक्री करीत असल्याने ती मानवी शरिरास अपायकारक असुन त्यामुळे सदर परिसरातील गावठी दारुचे सेवन करणा-या रहिवाश्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसंच गावठी हातभट्टीची दारु सेवन करणा-या इसमांच्या संसारात कलह निर्माण होवुन पत्नीस मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे तसेच दारुसाठी त्यांचेकडे पैश्याची मागणी करणे अशा घटना करतात. तसेच दारूच्या सेवन करून नशेत शारीराविरुध्द गुन्हे करतात. सदर इसमाच्या गावठी हातभट्टी दारुमुळे अनेक तरुण मुले दारुच्या आहारी गेले आहेत. तो राहत असलेल्या परिसरात राहणा-या माहिलांमध्ये भिती पसरली असुन नागरीक त्रस्त झाले आहे. सदरची गावठी दारु पिल्याने दारुच्या नशेत लोक अशोभनिय वर्तन करतात. नशेमध्ये रस्त्यामध्ये पडतात, सार्वजनीक ठिकाणी लघुशंका करतात, उलट्या करतात, व येणाया जाणा-या लोकांना शिवीगाळ करतात. महीला तसेच मुलींची टिंगल टवाळी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सदर ठिकाणचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच सदर इसमाच्या गावठी दारूच्या धंद्यावर गुंड प्रवृत्तीचे लोक येतात त्यामुळे सदर परिसरामध्ये नितीचे वातावरण झाले असुन सार्वजनिक शांततेचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शांतता प्रिय नागरिकांना सदर परिसरामध्ये राहणे त्रासदायक झाले आहे. म्हणुन श्री. डी. एस. पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबध्द करणे बावत चा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दि ३१/१०/२०२४ रोजी नाशिक मव्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून नमुद गुन्हेगार इसमास दि. ०१/१०/२०२४ रोजी ताब्यात घेवून नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानवध्द करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीसांकडुन मोक्का, तसेच एम. पी. डी.ए. कारवाया गुन्हेगार यांचेवर करण्यात येत आहेत. यापुढेही अभिलेखावरील गुन्हेगारांवर यासारख्या ठोस व प्रभावी कारवाया करण्यात येत आहेत. सराईत गुन्हेगारा कडून अशा प्रकारे कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटट्ल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

लक्ष ठेवण्यात आले असुन त्यांचेविरुध्द कठोर सदरची उल्लेखनिय कामगीरी मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, मा. नंदीनी वग्यानी सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. डि.एस.पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड व सहा.पो.फौजदार चंद्रकांत माने, पो.हवा. ६५१२ विशाल वारुळे, पो.शि. ८१३८ सावंत, पो.शि. ४९५५ स्वप्नील बांदल यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेवुन प्रस्ताव तयार केलेला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930