नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा शेअर मार्केट मध्ये जास्त परताव्याच्या आमिशाने फसवणा-या ठगास हडपसर पोलिसांनी घेतले ताब्यात – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

शेअर मार्केट मध्ये जास्त परताव्याच्या आमिशाने फसवणा-या ठगास हडपसर पोलिसांनी घेतले ताब्यात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

दिनांक ३/१०/२०२४

फिर्यादी यांना शेअर मार्केट शिकण्याची आवड होती. त्यासाठी ते Value trade share market व Trade Art share market हिंगणे कॅपीटल, फ्लॅट नं. १०१, ससाणेनगर, रामटेकडी रोड, हडपसर येथे गेले. तेथील क्लासचे संचालक प्रतिक कुमार चौखंडे यांनी फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास, गुंतविलेल्या पैशावर चांगला परतावा हा दर महिन्याला देईन. सदर परतावा हा १० टक्केने देण्यात येईल असेही सांगितले. फिर्यादी यांनी प्रतिक कुमार चौखंडे यांचेकडे शेअर मार्केटमध्ये २५,००,०००/रु. गुंतविले व त्याबाबतचा करारनामा केला. ऑगस्ट २०२४ पासून प्रतिक कुमार चौखंडे यांनी परतावा देण्याचे बंद केले. नंतर प्रतिक चौखंडे यांना त्यांचे मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. अधिक माहीती घेता फिर्यादी यांचेप्रमाणेच इतर ४३ गुंतवणूकदार यांची प्रतिक चौखंडे यांनी फसवणुक केल्याचे फिर्यादी यांचे लक्षात आले. फिर्यादी व अन्य गुंतवणूकदार असे मिळून एकुण ०५,९६,२१,०००/- रू इतक्या मोठ्या रक्कमेची आर्थिक फसवणुक केल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं. १५३७/२०२४, भा.द.वि. कलम ४०६,४०९,४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (एमपीआयडी) कलम ३ गुन्हा करण्यात आला.

सदरचा आरोपी हा फरार झाला होता. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संतोष पांढरे यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी प्रतिक कुमार चौखंडे वय ३६ रा. स्वप्नलोक सोसायटी पापडे वस्ती फुरसुंगी पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे श्री. आर राजा, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, यांनी केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930