सराईत आरोपीकडून २ गुन्हे उघडकीस आणून २,२१,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथक कडून हस्तगत
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दि :०३/१०/२०२४ पुणे जिल्हा संपादक : फिरोज शेख
पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनचोरीचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस सहआयुक्त, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन वाहनचोरी गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सुचना दिलेल्या होत्या.
सदर सुचनेच्या अनुषंगाने दि. ०२/१०/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोअं सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन संशयीत इसम दोन मोपेड गाडी विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार असल्याची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके व अंमलदार सुशांत भोसले, अनिल शिंदे, विजय अडकमोल, स्वप्निल घोलप यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना पकडले. त्यांना ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता १) यश सागर ओंबाळे, वय २३ वर्षे, रा. दुर्गामाता मंदीराचे जवळ,कंजारभाट, येरवडा पुणे. २) ओमकार राजेश मोरे, वय २१ वर्षे, रा. स. नं. १४, रामनगर, येरवडा पुणे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यात दोन मोपेड गाडी व ६ मोबाईल मिळाले सदरबाबत चौकशी करता उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम ३५ (ई) अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपीकडील गाडयाबाबत चतु श्रृंगी पो स्टे कडील अभिलेख पडताळून पाहिला असता चतु श्रृंगी पो स्टे गु र नं ६८१ / २४ बीएनएस ३०३ (२) व शिक्रापुर पो स्टे गु र नं ७९६ / २४ बीएनएस ३०३ ( २ ) अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हयातील चोरीस गेलेल्या २ मोपेड गाडी व ६ मोबाईल असा एकूण ०२, २१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री हिम्मत जाधव, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – ४, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे पोना सागर जगदाळे, पोअं अनिल दत्तात्रय शिंदे, सुरज ओंबासे, शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केलेली आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space