नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा भविष्यात नागरी सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने पशुसंवर्धन विभागाकडून जमीन ताब्यात घ्यावी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

भविष्यात नागरी सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने पशुसंवर्धन विभागाकडून जमीन ताब्यात घ्यावी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

दि. २३ जुलै २०२४

ताथवडे येथील स्पाईन रस्ता, उड्डाणपूल, एसटीपी यासारख्या
नियोजित नागरी सुविधा उभारणीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई, दि. २३ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरी सुविधा निर्मितीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) विकसित करण्यासह त्या जमिनीवर वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा. त्या जमिनीचा मोबदला पशुसंवर्धन विभागास देऊन महानगरपालिकेने जमीन ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज ताथवडे (जि.पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या स्पाईन रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबतच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीस महसूल व पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर आदी मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, ताथवडे परिसरासह पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात विविध उद्योग घटकांसह नवीन आयटी कंपन्याही येत आहेत. या सर्वांचा विचार करता ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत स्पाईन रस्ता आणि मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकास आराखड्यात ताथवडे येथील जागेचा समावेश करण्यात आला आहे. या जमिनीवर नागरी सुविधांची काही आरक्षणे टाकण्यात आली आहेत. पीएमआरडीए क्षेत्राचा विचार करता ताथवडे येथील मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. आवश्यक असणारी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास पशुसंवर्धन विभाग सकारात्मक आहे. त्यामुळे महापालिकेला आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधांसाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पशुसंवर्धन विभागास सादर करावा. पशुसंवर्धन विभागामार्फत जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला निश्चित करण्यात येईल. हा मोबदला भरून महापालिकेने जमीन लवकरात लवकर ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, ताथवडे परिसरासह पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी वाल्हेकरवाडी चौक ते औंध-रावेत रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे पर्यंतचा ४५ मीटर स्पाईन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरु करणे आवश्यक असल्याने जमीन हस्तांतर प्रक्रिया गतीने पार पाडावी. त्याचप्रमाणे येथील जमिनीवर २० एमएलडी क्षमतेचा मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भविष्यात जास्त क्षमतेचा प्रकल्प उभारावयाचा असल्यास मध्यवर्ती ठिकाणी जमीन मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यातील क्षमतावाढीच्यादृष्टीने अधिकची जमीन संपादित करून घ्यावी. या ठिकाणी स्पाईन रस्ता, उड्डाणपूल, एसटीपी आणि इतर विकास कामांसाठी १३ एकर जागेचा प्रस्ताव आहे. आवश्यकतेनुसार आत्ताच या क्षेत्रफळात वाढ करून नवीन प्रस्ताव पाठवावा. महानगरपालिकेने या जागेच्या वापराचा सविस्तर आराखडा तयार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
—–०००—–

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30