न्यायालयाच्या आदेशाच्या नियमबाह्यवर्तन करणाऱ्या पबचालक, हॉटेल व्यवसायिक यांच्यावर कठोर कारवाई करावी : स्वप्निल नाईक
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा
दिनांक.२४/६/२०२४ पुणे शहर हे जगाच्या नकाशावर विद्येचे माहेरघर म्हणून व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हजारो विद्यार्थी वस्तीगृहामध्ये वास्तव्य करून आहेत परंतु पुण्यामध्ये गेल्या काही वर्षापासून न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली अच्छाद मांडलेला असतो, मादक अमली पदार्थाच्या व्यसनाकडे तरुणाईला बळी पाडण्याचे कारस्थान समाजकंटकांकडून सर्रासपणे राबवले जात आहे, देशाच्या पुढील विकासासाठी व पुढील पिढीसाठी हे अत्यंत धोकादायक असल्याने पुणे शहरामध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये रात्री उशिरापर्यंत पब मध्ये बेधुंदपणे साऊंड चालू असणार आहेत, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब संस्कृतीला आळा घालणे, अत्यंत गरजेचे असल्याने आपल्या खात्यातर्फे यंदा सजग राहून या गैर कृत्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी व नियमबाह्यवर्तन करणाऱ्या पबचालक, हॉटेल व्यवसायिक यांच्यावर कठोर कारवाई करावी,
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री बारानंतर कुठेही ध्वनीक्षेपक लावू नयेत असे आदेश असताना सुद्धा सांस्कृतिक पुणे शहरात सर्रास रात्रभर साउंड चालू असतात, या पब मध्ये साऊंड चालू असताना बेधुंद अवस्थेत तरुणतरुणी पुण्यात वावरताना दिसतात आणि रस्त्यावर पोलीस बांधव व कर्मचारी यांच्याबरोबर हुज्जत घालतानाही आढळले आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहरातील सर्व पब आणि हॉटेल्स मध्ये रात्री 12 नंतर वाजणारे साऊंड व पुण्यात होणाऱ्या ख्रिसमस व न्यू इयरच्या रात्रीच्या पार्ट्या यांच्यावर कारवाई करावी, पब मध्ये जाणारे युवक युवती अठरा वर्षाचे आहेत का यासाठी तिथे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी पुण्यात कुठेही रात्री बारानंतर साऊंड वाजलेले आढळल्यास संघटना आपल्या कार्यालयाच्या बाहेर भजन व कीर्तन करून आपण कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या विरोधात निषेध नोंदवणार याची नोंद घ्यावी असे निवेदन पतित पावन संघटना तर्फे स्वप्नील नाईक यांनी यापूर्वी पोलीस आयुक्त यांना देण्यात आले होते
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space