नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा घोडेगाव येथील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराला चांगला प्रतिसाद कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून करिअर घडवा-मंत्री दिलीप वळसे पाटील – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

घोडेगाव येथील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराला चांगला प्रतिसाद कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून करिअर घडवा-मंत्री दिलीप वळसे पाटील

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे दि.22-महाविद्यालयीन युवक-युवतींनी कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून करिअर घडवावे, तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव यांच्या सहयोगाने आंबेगाव तालुक्यातील अवसारी येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मंत्री श्री.वळसे पाटील म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात जगात वेगाने बदल घडत आहेत. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. युवकांना नवनवीन क्षेत्र खुणावत आहे. या क्षेत्रातील बदलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह जाणून घेण्यासोबत महाविद्यालयीन जीवनात विविध कौशल्ये प्राप्त केल्यास जीवनात यश संपादन करता येईल.

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराकडे वळावे. स्वत: उद्योजक बनून इतरांना नोकरीची दारे खुली करावी. आपल्यातील क्षमता ओळखून आवडते क्षेत्र निवडावे. उपलब्ध सुविधा आणि आपल्या आवडीच्या आधारे करिअरचे नियोजन करावे. जीवनात यश संपादन करतांना देशाच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टाटा स्ट्राइव्हचे समन्वयक अमोल जाधव यांनी व्यक्तिमत्व विकासाबाबत माहिती देवून भावी उद्योजक बनण्यासाठी कौशल्यांवर भर देण्याचा सल्ला दिला. उद्योजक प्रवीण पंडित यांनी कार्यसंस्कृती विषयी तर रिलायन्स कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश बंदनापूरकर यांनी ‘रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी केले. घोडेगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. एस. जगताप यांनी संस्थेतील विविध अभ्यासक्रम आणि ऑन द जॉब ट्रेनिंगबाबत माहिती दिली.

शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्दचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील व हुतात्मा सहकारी बँकेचे संस्थापक वैभव नागनाथ नायकवडी आदी यावेळी उपस्थित होते

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2024
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031