नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार जनजागृती मोहिमेच्या शुभंकर चिन्हांचे अनावरण – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार जनजागृती मोहिमेच्या शुभंकर चिन्हांचे अनावरण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

पुणे, दि. २१ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ मध्ये अधिकाअधिक नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे यादृष्टिने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचे शुभंकर चिन्ह ‘एकी’चे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर आदी उपस्थित होते.

मतदार जनजागृती करण्यासाठी शुभंकर चिन्ह असलेले सेल्फी स्टँड तयार करण्यात आले आहे. यावर प्रदर्शित ‘एकी’ नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशिलात बदल आदी माहितीही देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. दिवसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी स्वत: सेल्फी घेऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी श्री. दिवसे यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना दिल्या.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2024
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930