चंदन नगर पोलिसांनी गांजा विक्री करणा-यांना परप्रांतीय इसमांना ठोकल्या बेड्या

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा
दि.०१/०२/२०२४ रोजी चंदननगर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंदननगर पोलीस स्टेशन ह्रदीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम नागपाल रोड, चंदननगर पुणे येथे गांजा विकणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी त्यांनी वरीष्ठांना कळवुन वरीष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कारवाई करणेकरीता टिम रवाना होवुन त्यांना बातमी मिळालेल्या ठिकाणी पोहचुन आडबाजुस थांबुन पाहणी केली असता सायंकाळचे सुमारास बातमीतील वर्णनाचे इसम सदर ठिकाणी दिसून आल्याने पोलीस स्टाफने त्यांना जागीच पकडुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) सागर कुमार वय २३ वर्षे, रा. ग्राम गोरीडी, पोस्ट-खमरीया, तहसील- औराई, जिल्हा संत बिदास नगर भदोई,राज्य-उत्तर प्रदेश, २) शिवम सरोज वय २२ वर्षे, रा. सदर असे असल्याचे सांगितले असता सागर कुमार याचे ताब्यातील प्रवासी सॅकबॅग तपासली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसल्याने त्यांना पुढील कारवाई कामी चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे विरूद्ध चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६५/२०२४, एन.डी.पि.एस. अॅक्ट ८ (क), २० (ब), २९ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे. त्यांचेकडे एकुण पावणेतीन किलो गांजासह मोबाईल व इतर असा एकुण ६९,४००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त, परि ४ श्री विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री.संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पो.स्टे. पुणे शहर,श्रीमती मनिषा पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे,अविनाश संकपाळ,सचिन रणदिवे, विष्णु गोणे, सचिन कुटे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर,शेखर शिंदे, यांनी केलेली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
