नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा विकसित भारत संकल्प’ यात्रेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी. ग्रामीण भागात यात्रेला ४ लाख नागरिकांची भेट – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

विकसित भारत संकल्प’ यात्रेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी. ग्रामीण भागात यात्रेला ४ लाख नागरिकांची भेट

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी*

*ग्रामीण भागात यात्रेला ४ लाख नागरिकांची भेट*

पुणे, दि. ३१ : विकसित भारत संकल्प यात्रेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून ८२६ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ७ हजार ६१९ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभदेखील देण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून ‘हर घर जल’ च्या ४०९ जोडण्या, ३४ ओडीएफ शौचालय, ३९० मृदा आरोग्य कार्ड, ४६८ उज्वला गॅस, ३ हजार ७३२ सुरक्षा विमा योजना, ३ हजार २३ नागरिकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला.

आरोग्य शिबिराअंतर्गत ८५ हजार ९०७ नागरिकांची तपासणी, ३५ हजार ६११ क्षय रोग तपासणी, २८ हजार ३४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २६ हजार ६२४ खेळाडू, ५३ हजार ६०६ विद्यार्थी, २६ हजार ७३६ स्थानिक कलाकार आणि ९९ हजार १४४ महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ३ हजार ८८० ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यात्रेद्वारे ५१२ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. २६० लाभार्थ्यांना शौचालय प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी १ लाख ९७ हजार ७८५ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.

विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2024
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031