महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पिंपरी, दि. २४ नोव्हेंबर २०२३ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्या सुमन पवळे, सामाजिक कार्यकर्ते ओंकार पवळे,संतोष कवडे, राजू सावंत, प्रदिप पाटील, पंकज बागडे, जयप्रकाश गावडे,सुनिता लांडे, नलिनी साळी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space